Tuesday, 21 July 2009

आयुष्यभराची कणकण

सुहास शिरवळ्कर बाबा खुप उपकार आहे रे तुझे माझ्यावर .....

.७-८ वीत असेल पुस्तक वाचण्याचा शैक जड्ला होता विशेष करुन कांदबरी .. मग काय गावात ली लायब्ररी आणि मी.. एका दीवसात दोन पुस्तक वाचुन काढायचो..सुरवातीला पुस्तकाची अशी काही विशेष कथा वगैरे पाहुन किंवा लेखक पाहुन पुस्तक वाचायचो नाही तर मुखप्रुष्ठ पाहुन अथवा ग्रंथपाल जे काढुन देईल ते...अशेच एकदा एक पुस्तक हाती लागले ...अर्त्यक काय भन्नाट पुस्त्क होते ते. तोपर्यंत वाचलेल्या सर्व पुस्तका पेक्षा वेगळे...

पुस्तक वाचल्यावर लेखकाचे नाव बघीतले ..सुहास शिरवळकर..म्ह्टल बस याचेच पुस्तक आणायचे वाचायला...आमच्या गावातली लायब्ररी तशी लहान पण त्यामधे होती नव्हती सर्व सु.शिं.ची पुस्तक वाचुन काढली..

बरसात चांद्ण्याची,जाई,ऑब्जेक्शन युवर ऑनर्,वेशापलीकडे,पडद्या आड,लटकंती,थोड्क्यात अंस, क्षण क्षण आयुष्य,सनसनाटी,दुनीयादारी,कल्पांत्,माध्यम्,स्पेल बाउंड्,ट्रेलर गर्ल आणि आणखी बरीचशी..

एक्..एक पुस्तक ही एक वेगळी कहानी आहे..एकदा पुस्तक हाती घेतल की संपल्यानंतरच ते हाताबाहेर व्ह्यायच ...काही पुस्तकांची तर कित्यक पारायण केली...गेले ते दिन गेले....

अशातच एक दीवस सु.शी. च्या निधनाची बातमी हाती आली अक्ष्ररक्ष रात्रभर रडलो...एकदा तरी ह्या माणसाला भेटायला हव होत हि कणकण आता आयुष्यभर राहील......

सुहास शिरवळ्कर बाबा खुप उपकार आहे रे तुझे माझ्यावर .....अशे एकदा पुन्हा म्हणावेसे वाट्ते....

Monday, 14 April 2008

तुझ्यावीना मी कसा जगलो.... (भाग-१)

आज समीरचे कामात लक्षच लागत नव्ह्ते आज ऑफीसमधे पुन्हा त्याला so called analysis of code चे काम मिळाले होते.जेव्हा तो कंपनी मधे कामावर रुजु झाला होता तेव्हा तो खुप उत्सुक होता काही चांगले काम करण्याकरीता पण खुपलवकरच त्याला वास्तवाची जाण आली. सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे एक मॄगजळ आहे जे दुरुणच चांगले वाटते हे तो लवकरच जाणुन चुकला. तर तो पुन्हा तेच crap work करत बसला होता.सेकंड शिफ्ट होती (दुपारी २.०० ते १०.३०) ह्या शिफ्ट चा एक फायदा जरुर असतो कि हे PL,ML लोक चांगले आपल्या सोयीनुसार जनरल शिफ्ट मधे येतात(सकाळी ९.०० ते६.००)आणि ६ वाजता निघुन जातात. ते गेले कि नो टेंशन सतत विनाकामी आपल्या Cubical च्या मागे येवुन काही बघण्याची भीती नसते कींवा तासात दहादा What's the status of your work विचारणार कोणी नसते.अरे बाबा तु कामच असे दिले कि त्याच status काय दयाव ते आजयागत कुणाला कळले नसेल तर असो... साधारण ६ ते ६:१५ ची वेळ समीर ब्रेक घेण्याकरीता उठला.चेहरा स्वच्छ धुऊण फ्रेश झाला आणि कडक कॉफीचा कप घेऊण बाहेर आला. कंपनीच्या १२ मजली इमारतीच्या ११ व्या मजल्यावर तो काम करीत होता . एका कोपर्यात कॉफी मशीन आणी एकदम अपोझीट साईडला बाहेरील बाजुस ऐसपेस जागा होती आणी समोरच एक मोठा अर्धी भिंत कव्हर करेल असा भला मोठा Transperant कांच होता. तो त्या कांचाजवळ आला आणी बाहेरील दृश्य न्याहाळु लागला . त्याच ते आवडत काम होत आणी तो यायचा पण अश्या वेळेस कि तेथे नेमक कोणी नसायच सर्व लोक आधीच येउण जायचे.आज पण त्याच्याशीवाय तेथे कोणीहि नव्हते.बाहेरील वातावरण खूपच छान होते . ऊन्हाळयाचे दिवस होते सुर्य दिवसभर आग ओकुण पुर्णपणे थकलेला आणी जाण्याच्या मार्गावर होता की उद्या पुण्हा रीचार्ज होऊण पूर्ण ताकदीनीशी आग ओकायला तयार.....तर सुर्य अस्त होण्याचा वेळ आणी नेमकी त्यामुळेच वातावरणात जाण आलेली.चेहर्याच्या समांतर बघीतले की मोठमोठ्याल्या बिल्डींग , फ्लायओव्हर आणी त्यावरुण जाणारी लोकल ट्रेन आणि थोड खाली बघितल की गर्द झाडी आणि मधुन एक लहान पायवाट बरोबर त्या गर्द झाडीला दोन भागांमधे विभागीत होती.मग त्याला क्षणभर वाटले की असेच बाहेर त्या पायवाटेवरुण धावत सुटावे...खुप वेळेपर्यंत आणि मग मधेच दीसले एखादे चिंचेच झाड कि ऊचल दगड आणि मार पुर्ण ताकदीणे कि एखाद चिंचेच खांड पडलेच पाहीजे... मग धावतच जायच ते उचलायला कुणी आपला मित्र घेईल त्या अगोदर .....अं..अं ..अं..कीती रम्य ते बालपण क्षणात वाहवत जातो आपण त्या आठवणीत नाही का? समीरचे पण असेच झाले होते पण लगेच भानावर आला आणि original चेहर्यावर professionalism चे make-up असल्याची जाण आली अरे....अरे पण ...हे काय होतय..... ओह ..गॉड ....नाही ....प्लीज ....पण त्या विरोधाला काही अर्थ नव्हता तो विरोध क्षणार्धात गळूण पडला त्याचे मन जिंकले आणि तो तीच्या आठवणीत ........... क्रमशः

Monday, 7 April 2008

कातरवेळ

कातरवेळ...कातरवेळेत अशी काय जादु असते की ती माणसाला आपल्या मागील आठवणीत मन्त्रमुग्ध करुण देते.
हया अश्या आठवणी असतात कि आपण त्याला कधिच विसरु शकत नाही.
बर ह्याआठवणी काहि एकाच प्रकारच्या असतात असे नव्हे तर त्या मनुष्यागणीक वेगवेगळ्या प्रकारच्या असु शकतात.कुणाला आपला शाळेचा पहिला दिवस,कॉलेजचा पहिला दिवस्,पहिल्या प्रेमाच्या आठवणी तर कुणाला आपल्या मित्रानसोबत घालविलेले क्षण तर कोठे क्रिकेट चे जिन्कलेले सामने.... अष्या आणि कितितरि अनेक आठवणी असु शकतात
तर म्हणण्याचे तात्पर्य अशे कि,हि जी कातरवेळ असते हि खुप चमत्कारीक अशि वेळ असते
दिवसभर आपपल्या कामात मग्ण असणारे आपण जेव्हा सुर्य अस्त होण्याच्या मार्गावर असतांना (साधारण ६ ते ६.३० चि वेळ)एकटेच आपल्या सुखाच्या क्षणात मग्ण होवूण जातो अचाणकच... नकळतच...काहि क्षणाकरिता.......
तर या अश्याच काहि आपल्या कातरवेळेतील क्षणाणा एकत्र करुया......