Tuesday, 21 July 2009

आयुष्यभराची कणकण

सुहास शिरवळ्कर बाबा खुप उपकार आहे रे तुझे माझ्यावर .....

.७-८ वीत असेल पुस्तक वाचण्याचा शैक जड्ला होता विशेष करुन कांदबरी .. मग काय गावात ली लायब्ररी आणि मी.. एका दीवसात दोन पुस्तक वाचुन काढायचो..सुरवातीला पुस्तकाची अशी काही विशेष कथा वगैरे पाहुन किंवा लेखक पाहुन पुस्तक वाचायचो नाही तर मुखप्रुष्ठ पाहुन अथवा ग्रंथपाल जे काढुन देईल ते...अशेच एकदा एक पुस्तक हाती लागले ...अर्त्यक काय भन्नाट पुस्त्क होते ते. तोपर्यंत वाचलेल्या सर्व पुस्तका पेक्षा वेगळे...

पुस्तक वाचल्यावर लेखकाचे नाव बघीतले ..सुहास शिरवळकर..म्ह्टल बस याचेच पुस्तक आणायचे वाचायला...आमच्या गावातली लायब्ररी तशी लहान पण त्यामधे होती नव्हती सर्व सु.शिं.ची पुस्तक वाचुन काढली..

बरसात चांद्ण्याची,जाई,ऑब्जेक्शन युवर ऑनर्,वेशापलीकडे,पडद्या आड,लटकंती,थोड्क्यात अंस, क्षण क्षण आयुष्य,सनसनाटी,दुनीयादारी,कल्पांत्,माध्यम्,स्पेल बाउंड्,ट्रेलर गर्ल आणि आणखी बरीचशी..

एक्..एक पुस्तक ही एक वेगळी कहानी आहे..एकदा पुस्तक हाती घेतल की संपल्यानंतरच ते हाताबाहेर व्ह्यायच ...काही पुस्तकांची तर कित्यक पारायण केली...गेले ते दिन गेले....

अशातच एक दीवस सु.शी. च्या निधनाची बातमी हाती आली अक्ष्ररक्ष रात्रभर रडलो...एकदा तरी ह्या माणसाला भेटायला हव होत हि कणकण आता आयुष्यभर राहील......

सुहास शिरवळ्कर बाबा खुप उपकार आहे रे तुझे माझ्यावर .....अशे एकदा पुन्हा म्हणावेसे वाट्ते....

1 comment:

Ajit said...

तीच सल माझ्याबरोबर पण नेहेमीकरिता राहणार आहे! :(